महालक्ष्मी एक्स्प्रेस...माणसांनी ठचाठच भरलेली...मी मुंबईहून पुण्यापर्यंत निघाले होते...दिवसभर काम करून गाडीत जरा झोप घ्यायची असं ठरवलं होतं पण गाडीत गर्दी इतकी की बसायला मिळालं हीच गोष्ट फार वाटली.
जरा स्थिरस्थावर झाले, आजूबाजूला नजर टाकली...गर्दी जरा गावाकडची होती...म्हणजे शहरी नक्कीच नव्हती. माझ्यासारख्या दोन-चार मुंबईला चढलेल्या मुली होत्या पण बाकी सगळे बहुधा गावाकडे चालले होते. महिलांच्या डब्यात अर्थात मुलंही कोंबली होती. तीही जागा सापडवून खेळायचा प्रयत्न करत होती.
थोड्या वेळानं सगळ्यांनी खाणं-पिणं सुरू केलं. डबा इतका अस्वच्छ होता की घरी जाऊन फ्रेश झाल्यावरच जेऊ या विचाराशिवाय आणखी काही करता येणं अवघड होतं. खिडकीशी बसलेल्या बाईनं तिचा "डबा' उघडला. रुमालात बांधलेली भाकरीची थप्पी, त्यावरच भात, त्यावर भाजी आणि खर्डा...बाई जेवत होती, जेवायचं का असं तिनं मुलांना विचारलं आणि ती नाही म्हणल्यावर फार आग्रह केला नाही. अचानक तिच्या मुलानं रुमालातला भात मुठीत भरून घेतला आणि तो गाडीत सगळीकडे भात उडवायला लागला. गाडीतल्या सगळ्यांचेच चेहरे तुसडे झाले. त्याची आई त्याला काही बोलेना. मग गाडीतल्याच कोणीतरी त्या बाईलाही खडसावलं. तरी ती बाई फारसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी तिनं मुलाला दोन लगावल्या आणि खिडकीबाहेर बघत बसली.
शेजारणीनं तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं, की ती नवऱ्याला शोधायला मुंबईला आली होती. दोन मुलांना घेऊन...नवरा मुंबईला काम करतो इतकीच तिला माहिती...तो आत्तापर्यंत फक्त दोनदाच गावाला आला होता, आणि पदरात दोन मुलं टाकून गेला. सासरी हाकलून लावलं म्हणून ती नवऱ्याला शोधायला आली होती. तो मिळाला नाही, म्हणून गावाकडे जाणाऱ्या गाडीत बसली. सासरी तर जाताच येणार नव्हतं. त्यामुळे आता पुढे कुठे जावं याची विचार करत होती. मुलानं इतर प्रवाशांच्या अंगावर खरकटं उडवणं तिला दिसूनही दिसत नव्हतं.
तिचं ऐकून गाडीतले सगळे तुसडे चेहरे बदलले. गाववाले, शहरी...सगळेच...त्या बाईचा चेहरा अजून डोळ्यापुढे आहे माझ्या...मुलांना घेऊन आता उतरायचं कुठे आणि राहायचं कुठे आणि खायचं काय असे प्रश्न होते तिच्यापुढे...आणि आम्ही गाडीत कसं वागावं याचे धडे देत होतो तिला...
तेव्हा फार जाणवलं, की आपल्याला माणूस दिसतो त्याच्या पलीकडे कितीतरी अधिक असतो.
पटापट निष्कर्षप्रत यायची घाई असते ती आपल्याला...पण समोरच्याच्या वागण्याचा काही निराळा अर्थ असू शकतो, पेक्षा ते वागणं जरी "चुकीचं' असेल तरी त्यामागचं कारण मोठं असू शकतं याची जाणीव त्या दिवशी तीव्रतेनं झाली...आता कधीही, कोणीही, कसंही वागलं तरी, यामागे काहीतरी कारण असू शकेल हा शक्यतेचा एक टक्का मी कायम राखून ठेवते. त्यामुळे न्यायाधिशाच्या खुर्चीतून पायउतार होऊन परिस्थिती नितळपणानं बघण्यासाठी प्रयत्न करता येतो ...
Tuesday, August 26, 2008
Wednesday, May 21, 2008
चहाकडे...
पाच वाजेपर्यंत डोळ्याचे बटाटे झाले ...सकाळी आठपासून पाचपर्यंत तडाम् तडाम् काम केल्याचा परिणाम...पाच वाजता मात्र पोटातल्या भुकेनं कामात चुका व्हायला लागल्या. किती किती बाई आपण कामसू...असं आत कुठेतरी वाटत होतंच. आणि मग चहास कूच केले...अरे, चहा हा काय पदार्थ आहे..अर्धा चहा मारल्यावर जो काय थकवा पळाला आहे म्हणून सांगू...आमचा चहावाला पण रम्य आहे...ज्यांच्या चेहऱ्यावर चहासाठी आग पडलेली असते, त्यांच्याकडे तो ढुंकून बघत नाही. पुन्हा मराठीची बोंब...हिंदीतून त्याला ओरडायचं...म्हणजे वाक्य जुळवेपर्यंत तो गेलेला असतो...चहावाली पोरं आणि त्याचा मालक अजब आहेत. कितीही सांगितलं तरी त्याला हवा तेवढा वेळ लावूनच तो खाणं पिणं पेश करतो. वसकन सदराखाली ओरडलं तरी हा शांतच...थोर आहे. आमच्या डिपार्टमेंटला असता तर मोठा आदमी झाला असता...तर असं...चहा ढोसून परतले. मग वर आल्यावर परत चहा....कारण कधीच चहा न देणारा पोरगा चहा हातात घेऊन उभा..त्याचा अपमान कसा करायचा...चहाची निराळीच आस असते. म्हणजे त्या वेळी तो हवा तर हवाच असतो. तेव्हा सरबत, कॉफी, ताक असे पदार्थ नको नकोसेच वाटतात. अजब आहे. अर्धा चहा...लडबडत्या प्लॉस्टिकच्या कपात..म्हणजे एक घोट पण नाही भरंत. पण त्या एका घोटासाठी असोशी भारी असते. म्हणजे चहाची वाट एक तास, घोट एक सेकंद...मग पुढच्या घोटाची वाट एक तास...असं करत करत बापडा दिवस ढकलावा लागतो. कधी ठरवलं की बुवा बारीक व्हायचं...पहिलं म्हणजे चहा बंद...बंद म्हणजे बंदच...विचारसुद्धा करायचा नाही...पण हे फार तर दोन तास टिकतं. आजुबाजूचे चहा गिळायला लागले की अक्षरशः इतरांपेक्षा कमी पगार मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे इतकं "लागतं.' चहा पाहिजेचच......आत्ताही हा चहावाला पोऱ्या माझ्याकडे थंडपणे बघत गरम गरम चहा भरलेलं पिंप घेऊन निघून गेला..ठीक आहे झालं...जातो आम्हीच पुन्हा चहाकडे...अडला हरी...!!!
Tuesday, May 13, 2008
समुद्रातलाच पाऊस तो....येऊ देत...
आपण लिहायचं...आणि ते समोरच्याला आवडलं तर ते वाचलं जाईल...हे फार थोर आहे... नाहीतर उगाच वाचाळ-तोंडाळ कोणी गमजा मारीत बसतो आणि आपण सहकाऱ्यांशी संबंध कशाला बुवा बिघडवा म्हणून चेहऱ्याला सुरकुत्या पाडून ऐकत बसतो...यात आपल्याला जे बोलायचं ते राहूनच गेलेलं असतं...तर ते राहिलेलं बोलण्यासाठी त्यासाठी हा समुद्रातला पाऊस !
आमचा पाऊस झेला...तुमचाही पाडा त्यात...काही म्हणणं नाही ...समुद्रातलाच पाऊस तो....येऊ देत...
आमचा पाऊस झेला...तुमचाही पाडा त्यात...काही म्हणणं नाही ...समुद्रातलाच पाऊस तो....येऊ देत...
अध्यात्मिक हाय
अध्यात्म आणि माझा दुरूनही संबंध नव्हता... मुळात शांतबसून, न बोलता जे करता येतं त्या कोणत्याच कधी जाता आलं नाही. न बोलता वाचन हा एकप्रकार सोडला तर ध्यान, मनन, चिंतन, प्राणायाम, योग हे सारं माझ्यासाठीनाही याची खात्रीच होती. पण अचानक, थेट परम शांततेत "परमात्म्या'च्याभेटीचाच योग आला...आणि तो विलक्षण आनंददायी होता.एक महिन्यापूर्वी, पाठ दुखते म्हणून माझ्या फॅमिली डॉक्टरकडूनगोळी लिहून आणली. रात्रीचं जेवण करून गोळी घेतली... ही गोळी मला"सर्वशक्ती'ला भेटवणार आहे याची तेव्हा पुसटही कल्पना नव्हती.पराग, माझा नवरा उशिरा आला, मग आम्ही कोणता तरी चित्रपटपाहिला आणि रात्री बारा वाजता अचानक पहिलीच्या आधी दुसरी,दुसरीच्या आधी तिसरी अशा घाईघाईनं शिंका आल्या. अस्वस्थ होऊनमी उठून झोपायला निघाले आणि समोरच्या आरशात नजर गेली. तिथेकोणीतरी वेगळीच व्यक्ती होती! तिचा चेहरा उशीएवढा होता... फक्तपाचच मिनिटांत शरीरावर सूज आली... चेहऱ्याचा रंग निळा व्हायलालागला. हातापायांचा "हत्ती' झाला... आणि शरीरातून गरम वाफा बाहेरपडताहेत असं वाटायला लागलं. परागनं माझ्या अवस्थेकडे बघूनडॉक्टरला फोन केला... तिनं तातडीनं दीनानाथ रुग्णालयात यायलासांगितलं.सहकारनगरपासून "दीनानाथ'चा रस्ता हा कधीच न विसरतायेणारा अनुभव होता. रस्ता संपेपर्यंत माझी शुद्ध हळूहळू हरपत आहेयाची जाणीव होत होती. म्हात्रे पूल ओलांडताना पलीकडचे दिवे धूसरहोत आहेत हे उमजत होतं आणि मी परागला म्हणाले, की माझी शुद्धहरपते आहे... त्यानंतर "दीनानाथ' येईपर्यंत मी एका विलक्षण शांततेचाअनुभव घेतला. म्हणजे पूर्ण बेशुद्ध नव्हते. मात्र आपल्याला दिसतं,त्या जगण्याच्या परिघातही नव्हते. पण तरीही आतून जागी होते... हेलिहायला, सांगायला, वाचायला, समजायला क्लिष्ट असेल कदाचित,पण एक भरीव शांतता मी "ऐकत' होते. तिथे माझ्यासोबत कोणीचनव्हतं...पण मी एकटीही नव्हते!केवळ दोन वळणांवर "दीनानाथ' होतं. तिथे पोचल्यावर, माझ्याडॉक्टरला बघितल्यावर, तिच्या हातात प्रिस्क्रिप्शन आणि उरलेल्यागोळ्या दिल्यावर मी पूर्ण बेशुद्ध झाले... कारण त्यानंतरचं मला काहीआठवत नाही. मात्र म्हात्रे पूल ते "दीनानाथ' हा छोटा प्रवासही माझ्यासाठी"दीर्घ' ठरला होता. तेव्हा मी शुद्धी- बेशुद्धीच्यासीमारेषेवर होते बहुधा... आत्तापर्यंतकधीही न अनुभवलेली शांतता, विलक्षण शांततामाझ्यात झिरपत होती. सारा दोन-तीन मिनिटांचा अनुभवअसेल तो! पण तो काळ कधीच विसरता येणार नाही.गोळीची जी रिऍक्शन आली होती त्याला वैद्यकीय भाषेत"ऍनाफिलॅक्टिक शॉक' असं म्हणतात. अशी "रिऍक्शन' काही माणसांनाकाही विशिष्ट गोळ्यांची येऊ शकते. त्याबद्दल नंतर डॉक्टरकडून आणिनंतर "नेट'वर शोधतानाही कळलं, की जर वेळेवर उपचार मिळाले नसते,म्हणजे अगदी पाच मिनिटांचा उशीर झाला असता, तर माझा हसरा फोटोआणि चंदनी हाराचा उपयोग करता आला असता!त्या अनुभवातून जिवंत बाहेर पडल्यानंतर आताही किती तरी वेळाम्हात्रे पूल ते "दीनानाथ' हा त्या रात्रीचा सव्वाबारा वाजताचा प्रवासजागवण्याचा प्रयत्न करते. आणि गंमत म्हणजे, मला तो अनुभव सुखदवाटतो! हे असं म्हणणं विचित्र आहे, तेव्हा परागची अवस्था बिकट झालीहोती, हे मला पक्कं माहिती आहे. पण मी मात्र तेव्हा निराळ्या जगातविहरत होते.त्या "शॉक'मध्ये घडणाऱ्या घटनांप्रमाणे असेल कदाचित, पण माझ्याशरीराचे सारे भाग जगण्यासाठी न झगडता शांतपणे बंद होत होते. माझंशरीर श्वासासाठी न तडफडता जगाचा निरोप घेत थांबण्याची तयारीकरत होतं. ते मला फार आवडलं. कारण ते फार समजूतदार होतं. एकप्रकारची शांतता शरीरानं मनाला दिली असावी. मला अगदी आतून वाटतहोतं, की झालं सारं... संपलं... त्याबद्दल काही तक्रार नव्हती. हे विचारउच्चारण्याची शुद्ध नव्हती; पण तो विचार न कळण्याइतकी बेशुद्धीहीनव्हती. जे घडत आहे त्याबद्दल अस्वस्थपणा नव्हता. घरातून निघतानामी जितकी अस्वस्थ होते तितकी दीनानाथला पोचेपर्यंत शांत झाले होते."असं कसं गं झालं...अरेरे...' असं काही मला वाटलं नाही, . उलट, इतर कोणालाही येणार नाही असा "आध्यात्मिक हाय'मला मिळाला... शरीर-मन यांचं निराळं अस्तित्व जाणवलं... शरीराचीनश्वरता अगदी आतून अनुभवता आली. शांतता ऐकता येते, ती पोकळनाही तर भरीव असते हे समजलं। शरीर वेदनेत अडकलेलं असताना मनत्याच वेळी शरीरातून सुटू शकतं, शरीराच्या वेदनांपेक्षा दूर जाऊ शकतं,हे जाणता आलं. त्या अनुभवानं समृद्ध झाल्यासारखं वाटलं!
--------------
--------------
Subscribe to:
Comments (Atom)