Wednesday, May 21, 2008
चहाकडे...
पाच वाजेपर्यंत डोळ्याचे बटाटे झाले ...सकाळी आठपासून पाचपर्यंत तडाम् तडाम् काम केल्याचा परिणाम...पाच वाजता मात्र पोटातल्या भुकेनं कामात चुका व्हायला लागल्या. किती किती बाई आपण कामसू...असं आत कुठेतरी वाटत होतंच. आणि मग चहास कूच केले...अरे, चहा हा काय पदार्थ आहे..अर्धा चहा मारल्यावर जो काय थकवा पळाला आहे म्हणून सांगू...आमचा चहावाला पण रम्य आहे...ज्यांच्या चेहऱ्यावर चहासाठी आग पडलेली असते, त्यांच्याकडे तो ढुंकून बघत नाही. पुन्हा मराठीची बोंब...हिंदीतून त्याला ओरडायचं...म्हणजे वाक्य जुळवेपर्यंत तो गेलेला असतो...चहावाली पोरं आणि त्याचा मालक अजब आहेत. कितीही सांगितलं तरी त्याला हवा तेवढा वेळ लावूनच तो खाणं पिणं पेश करतो. वसकन सदराखाली ओरडलं तरी हा शांतच...थोर आहे. आमच्या डिपार्टमेंटला असता तर मोठा आदमी झाला असता...तर असं...चहा ढोसून परतले. मग वर आल्यावर परत चहा....कारण कधीच चहा न देणारा पोरगा चहा हातात घेऊन उभा..त्याचा अपमान कसा करायचा...चहाची निराळीच आस असते. म्हणजे त्या वेळी तो हवा तर हवाच असतो. तेव्हा सरबत, कॉफी, ताक असे पदार्थ नको नकोसेच वाटतात. अजब आहे. अर्धा चहा...लडबडत्या प्लॉस्टिकच्या कपात..म्हणजे एक घोट पण नाही भरंत. पण त्या एका घोटासाठी असोशी भारी असते. म्हणजे चहाची वाट एक तास, घोट एक सेकंद...मग पुढच्या घोटाची वाट एक तास...असं करत करत बापडा दिवस ढकलावा लागतो. कधी ठरवलं की बुवा बारीक व्हायचं...पहिलं म्हणजे चहा बंद...बंद म्हणजे बंदच...विचारसुद्धा करायचा नाही...पण हे फार तर दोन तास टिकतं. आजुबाजूचे चहा गिळायला लागले की अक्षरशः इतरांपेक्षा कमी पगार मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे इतकं "लागतं.' चहा पाहिजेचच......आत्ताही हा चहावाला पोऱ्या माझ्याकडे थंडपणे बघत गरम गरम चहा भरलेलं पिंप घेऊन निघून गेला..ठीक आहे झालं...जातो आम्हीच पुन्हा चहाकडे...अडला हरी...!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
I always love ur style of writing very lively and straight from the heart.. So chal, ek cutting marayla harkat nahi
Chaha pyavasa vatla parat ekda!
चहाचं चर्वण भारी, तल्लफ येणाऱया पदार्थविशेषात चहांच तसा कमी घातक. आणि त्याची ( इतक्या कमी घातक गोष्टींची) आपल्याला तल्लफ येते हे वाचून बरें वाटले............
Post a Comment