Tuesday, May 13, 2008

अध्यात्मिक हाय

अध्यात्म आणि माझा दुरूनही संबंध नव्हता... मुळात शांतबसून, न बोलता जे करता येतं त्या कोणत्याच कधी जाता आलं नाही. न बोलता वाचन हा एकप्रकार सोडला तर ध्यान, मनन, चिंतन, प्राणायाम, योग हे सारं माझ्यासाठीनाही याची खात्रीच होती. पण अचानक, थेट परम शांततेत "परमात्म्या'च्याभेटीचाच योग आला...आणि तो विलक्षण आनंददायी होता.एक महिन्यापूर्वी, पाठ दुखते म्हणून माझ्या फॅमिली डॉक्‍टरकडूनगोळी लिहून आणली. रात्रीचं जेवण करून गोळी घेतली... ही गोळी मला"सर्वशक्ती'ला भेटवणार आहे याची तेव्हा पुसटही कल्पना नव्हती.पराग, माझा नवरा उशिरा आला, मग आम्ही कोणता तरी चित्रपटपाहिला आणि रात्री बारा वाजता अचानक पहिलीच्या आधी दुसरी,दुसरीच्या आधी तिसरी अशा घाईघाईनं शिंका आल्या. अस्वस्थ होऊनमी उठून झोपायला निघाले आणि समोरच्या आरशात नजर गेली. तिथेकोणीतरी वेगळीच व्यक्ती होती! तिचा चेहरा उशीएवढा होता... फक्तपाचच मिनिटांत शरीरावर सूज आली... चेहऱ्याचा रंग निळा व्हायलालागला. हातापायांचा "हत्ती' झाला... आणि शरीरातून गरम वाफा बाहेरपडताहेत असं वाटायला लागलं. परागनं माझ्या अवस्थेकडे बघूनडॉक्‍टरला फोन केला... तिनं तातडीनं दीनानाथ रुग्णालयात यायलासांगितलं.सहकारनगरपासून "दीनानाथ'चा रस्ता हा कधीच न विसरतायेणारा अनुभव होता. रस्ता संपेपर्यंत माझी शुद्ध हळूहळू हरपत आहेयाची जाणीव होत होती. म्हात्रे पूल ओलांडताना पलीकडचे दिवे धूसरहोत आहेत हे उमजत होतं आणि मी परागला म्हणाले, की माझी शुद्धहरपते आहे... त्यानंतर "दीनानाथ' येईपर्यंत मी एका विलक्षण शांततेचाअनुभव घेतला. म्हणजे पूर्ण बेशुद्ध नव्हते. मात्र आपल्याला दिसतं,त्या जगण्याच्या परिघातही नव्हते. पण तरीही आतून जागी होते... हेलिहायला, सांगायला, वाचायला, समजायला क्‍लिष्ट असेल कदाचित,पण एक भरीव शांतता मी "ऐकत' होते. तिथे माझ्यासोबत कोणीचनव्हतं...पण मी एकटीही नव्हते!केवळ दोन वळणांवर "दीनानाथ' होतं. तिथे पोचल्यावर, माझ्याडॉक्‍टरला बघितल्यावर, तिच्या हातात प्रिस्क्रिप्शन आणि उरलेल्यागोळ्या दिल्यावर मी पूर्ण बेशुद्ध झाले... कारण त्यानंतरचं मला काहीआठवत नाही. मात्र म्हात्रे पूल ते "दीनानाथ' हा छोटा प्रवासही माझ्यासाठी"दीर्घ' ठरला होता. तेव्हा मी शुद्धी- बेशुद्धीच्यासीमारेषेवर होते बहुधा... आत्तापर्यंतकधीही न अनुभवलेली शांतता, विलक्षण शांततामाझ्यात झिरपत होती. सारा दोन-तीन मिनिटांचा अनुभवअसेल तो! पण तो काळ कधीच विसरता येणार नाही.गोळीची जी रिऍक्‍शन आली होती त्याला वैद्यकीय भाषेत"ऍनाफिलॅक्‍टिक शॉक' असं म्हणतात. अशी "रिऍक्‍शन' काही माणसांनाकाही विशिष्ट गोळ्यांची येऊ शकते. त्याबद्दल नंतर डॉक्‍टरकडून आणिनंतर "नेट'वर शोधतानाही कळलं, की जर वेळेवर उपचार मिळाले नसते,म्हणजे अगदी पाच मिनिटांचा उशीर झाला असता, तर माझा हसरा फोटोआणि चंदनी हाराचा उपयोग करता आला असता!त्या अनुभवातून जिवंत बाहेर पडल्यानंतर आताही किती तरी वेळाम्हात्रे पूल ते "दीनानाथ' हा त्या रात्रीचा सव्वाबारा वाजताचा प्रवासजागवण्याचा प्रयत्न करते. आणि गंमत म्हणजे, मला तो अनुभव सुखदवाटतो! हे असं म्हणणं विचित्र आहे, तेव्हा परागची अवस्था बिकट झालीहोती, हे मला पक्कं माहिती आहे. पण मी मात्र तेव्हा निराळ्या जगातविहरत होते.त्या "शॉक'मध्ये घडणाऱ्या घटनांप्रमाणे असेल कदाचित, पण माझ्याशरीराचे सारे भाग जगण्यासाठी न झगडता शांतपणे बंद होत होते. माझंशरीर श्‍वासासाठी न तडफडता जगाचा निरोप घेत थांबण्याची तयारीकरत होतं. ते मला फार आवडलं. कारण ते फार समजूतदार होतं. एकप्रकारची शांतता शरीरानं मनाला दिली असावी. मला अगदी आतून वाटतहोतं, की झालं सारं... संपलं... त्याबद्दल काही तक्रार नव्हती. हे विचारउच्चारण्याची शुद्ध नव्हती; पण तो विचार न कळण्याइतकी बेशुद्धीहीनव्हती. जे घडत आहे त्याबद्दल अस्वस्थपणा नव्हता. घरातून निघतानामी जितकी अस्वस्थ होते तितकी दीनानाथला पोचेपर्यंत शांत झाले होते."असं कसं गं झालं...अरेरे...' असं काही मला वाटलं नाही, . उलट, इतर कोणालाही येणार नाही असा "आध्यात्मिक हाय'मला मिळाला... शरीर-मन यांचं निराळं अस्तित्व जाणवलं... शरीराचीनश्‍वरता अगदी आतून अनुभवता आली. शांतता ऐकता येते, ती पोकळनाही तर भरीव असते हे समजलं। शरीर वेदनेत अडकलेलं असताना मनत्याच वेळी शरीरातून सुटू शकतं, शरीराच्या वेदनांपेक्षा दूर जाऊ शकतं,हे जाणता आलं. त्या अनुभवानं समृद्ध झाल्यासारखं वाटलं!
--------------

2 comments:

Subodh Pathak said...

This reminded me of the experience of Paul Brunton in his book 'Bhartachya Adhyatmik rahasyachya shodhat'. He has narrated his experience of samadhi when he was with Raman Maharshi...very difficult to feel...and more difficult to put in words...

Unknown said...

Quite interesting! Looking forward to more thoughts and words frm u.
Mads